Share

डेल्टा विषाणूच्या विरोधात ‘ही’ लस ठरणार गेम चेंजर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

दरम्यान आता महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रूग्ण संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या लस नवीन व्हेरिएंटवर कमी प्रभावी असल्याचे मानले जाते आहे. त्यामुळे लसींची निर्मिती करणाऱ्याला प्रभावी लस शोधण्यास भाग पाडले जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान सर्व लसीच्या चाचण्यांमध्ये हैदराबाद स्थित असणाऱ्या भारत बायोटेकने विकसित केलेली नेजल व्हॅक्सिन गेम-चेंजर असल्याचे मानले जात आहे.

नेजल व्हॅक्सिनच्या नुकताच दुसरा आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांसाठी मंजूर झाली आहे. नेजल व्हॅक्सिन व्हायरसविरूद्ध शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत कऱण्यास आणि ती वाढवण्यात मदत करत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या, जगभरात काही कंपन्या नेजल व्हॅक्सिनवर काम करत आहेत. काही कंपन्यांच्या चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत, तर काही अद्याप चाचणीसाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. भारतात, भारत बायोटेक नेजल व्हॅक्सिनच्या चाचणीवर काम करत असून ही फार्मास्युटिकल कंपनी गेल्या वर्षापासून या लसीवर काम करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!