Share

मराठवाड्यात  दोन दिवस पावसाचे; वरुणराजा जोरदार बरसणार!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : येणारे दोन दिवस ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. गेल्या काही दिवसात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी कोरडेठाक असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. आता येणाऱ्या काळात पुन्हा एकदा वरूणराजा जोरदार बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नागपंचमी, बैल पोळा, गणेशोत्सवादरम्यान पाऊस जोरदार हजेरी लावत असतो. यंदाही नागपंचमी सण होताच दोन तीन दिवस सलग पावसाने हजेरी लावली होती. तसेच पुढे बैलपोळा, गणेशोत्सव दरम्यान पाऊस हजेरी लावेल की काय? अशी देखील शक्यता सध्या वर्तविली जात आहे. यंदा नागपंचमी सण होताच पावसाने औरंगाबादमध्ये हजेरी लावली होती. २१ ऑगस्टपर्यंत  मात्र पाऊस गायब झाल्याचे दिसून आले.

असे असले तरी आता मराठवाड्यात मंगळवारी (दि.३१) आणि बुधवारी (दि.१) या दोन दिवशी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे. विदर्भात पाऊस कमी पडण्याची शक्यता दिसते असेही औंधकर यांनी सांगितले. याशिवाय परतीचा पाऊस म्हणत असाल तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर परतीचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!