🕒 1 min read
बीड : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश आडसकर यांच्या ताब्यातील साखर कारखान्याशी संबधित एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याची २५ एक्कर जमीन विकल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी २५ एकर जमीन विकण्यास साखर आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र, जमीन विकूनही अद्याप शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. यामुळे जमीन विक्री केलेले पैसे गेले कुठं? असा सवाल शेतकरी करत आहेत.
शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी सांगितले की, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याने साखर कारखानदारीच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्याच्या कारणाने २५ एकर जमिनीची विक्री केली आहे. तसेच कारखान्याच्या जमीन विक्रीचा व्यवहार संशयास्पद असून यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, म्हणून हा आदेश मागे घ्यावा अशीही मागणी आपेट यांनी केली आहे.
साखर आयुक्तांच्या अटींचे उल्लंघन
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला, ७ जून २०२१ रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी, अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी २५ एकर जमीन विकण्यास परवानगी दिली होती. शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे व्याजासह न मिळाल्यामुळे साखर आयुक्तांनी घातलेल्या अटींचे अंबासाखरने उल्लंघन केल्याचे स्पष्ट होते. सदरील प्रकाराची गंभीर दखल घेऊन साखर आयुक्तांनी जमीन विक्रीला तातडीने स्थगिती द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे भाई मोहन गुंड यांनी केली आहे.
एक रुपयांची अफरातफर नाही-चेअरमन आडसकर
शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देण्यासाठी आम्ही पंचवीस एकर जमीन विकली आहे. मात्र, यामधून एकही रुपया इकडे तिकडे गेलेला नाही. यातून शेतकऱ्यांच्या उसाची थकीत बिले दिली आहेत. तसेच हा व्यवहार पारदर्शक झाला असून कारखान्यावर प्रशासक नेमल्यानंतर, कारखान्याला कुठल्या बँकेने कर्ज दिले नाही. म्हणून सभासदांच्या ठेवी मधून कारखाना चालू ठेवला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे हित व्हावे, हाच मुख्य उद्देश असल्याचे भाजपा नेते तथा कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नाव राणे असलं तरी चर्चा फक्त चार आण्यांची करतात’, अब्दूल सत्तारांचा टोला
- ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांवर विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले..
- ..तर पोलिसांनी भाजपा नेत्यांचे मुसक्या आवळाव्यात, कुठलीही दया दाखवू नये-सचिन सावंत
- ‘नेत्यांना पक्षात घेऊन वापरायचे, हेच भाजपचे धोरण’, जयंत पाटलांची टीका
- ‘विमा कंपन्या आणि केंद्र सरकारमध्येच सेटलमेंट’, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
