🕒 1 min read
औरंगाबाद : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातून पर्यटनाला जाणाऱ्या आणि पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढावी, यासाठी हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. नागरी विमान वाहतूक समितीच्या दिल्ली मध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिंधिया यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, ‘पर्यटन क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी थायलंड आणि भारतातील इतर बौद्ध केंद्रांसह औरंगाबादची आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटी असण्याची मागणी विचारात घेण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आभार. द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये अधिक हवाई जोडणीचा मुद्दा दिल्लीत नागरी विमान वाहतूक समितीच्या बैठकीत उपस्थित केला.’
Thank @JM_Scindia for considering demand to have international air connectivity of Aurangabad with Thailand and other Buddhist centres in India to revive tourism sector. Raised the issue of more air connectivity in tier2 cities in the civil aviation committee meeting in Delhi.
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) August 27, 2021
औरंगाबाद हे राज्याची पर्यटन राजधारी असली तरी योग्य सुविधा नसल्याने पर्यटक पाठ फिरवतात. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ लेणी पाहण्यासाठी विदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यांना हवाई कनेक्टिव्हिटी चांगली मिळाल्यास पर्यटकांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- कॉंग्रेसच्या कार्यकारणीत राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा यांना पक्षाने दिली मोठी संधी, भावूक होऊन म्हणाल्या…
- ‘विराट ‘या’ दिवशी करणार शतकी खेळी’; 19 वर्षीय भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- औरंगाबाद काँग्रेसमधील गटा-तटाच्या राजकारणाचा ताळमेळ जमवण्यात नाना पटोले यशस्वी झाले का?
- ‘ओबीसी आरक्षणावर अजून निर्णय नाही, येत्या शुक्रवारी होणार बैठक’, पटोलेंची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
