🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी जन आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महाड, नाशिकसह पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून राणे यांना काल पोलिसांनी अटक देखील केली होती. तर, मंगळवारी सकाळपासूनच शिवसेना-भाजपमध्ये राडा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
राणेंना मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. आता उच्च नायालयाने देखील नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला आहे.
सुनावणी दरम्यान १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची आदेश हायकोर्टाने दिले असून राज्य सरकारने देखील त्याबाबत हमी दिली आहे. तसेच राणेंवर जिथे गुन्हे दाखल आहेत तिथे हजेरी लावण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करतानाच देश कायद्याने चालतोय हे सिद्ध झालंय, असं म्हटलं. पुढे ते म्हणाले, मी असं काय बोललो होतो, ज्यामुळे तुम्हाला राग आला? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना विचारला आहे. तसेच हे बोलत असताना ‘ते’ वाक्य मी पुन्हा बोलणार नाही’ असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींच्या मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान दिल्याने सूडबुद्धीने ही कारवाई, भाजप कार्यकर्त्यांचा संताप अनावर!
- नाणेफेक जिंकत विराटने संपवला ‘तो’ इंग्लंडमधील दुष्काळ
- राणेंना कोर्टाचा दिलासा ; कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाकडून आदेश
- हेंडिग्ले कसोटीत नाणेफेक जिंकत विराटचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- ‘भोक तुमच्या फुग्याला पडलंय राऊतसाहेब…’ ; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
