🕒 1 min read
मुंबई : ‘सैराट’ या चित्रपटातील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या लोकप्रियतेत तसूभरही कमी झालेली नाही. रिंकू इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. आता ‘सैराट’ फेम आर्चीची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राज राजगुरूने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CS_MSbYKGxX/?utm_medium=copy_link
रिंकूने शेअर केलेल्या या फोटोत तिने बेज कलरच्या पॅन्टवर एक ब्रालेट परिधान केलं आहे. तर एक शर्ट जॅकेटप्रमाणे तिने घातलं आहे. ‘दोन सेकंदांसाठी विचार करणं थांबवा आणि आयुष्यात जे समोर आलंय त्याचा आनंद लुटा अशा आशयाचं सुंदर कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिलं आहे. तिचा हा फोटो अनेक चाहत्यांच्या पसंतीस पडत असून सध्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
हल्ली रिंकू राजगुरू तिच्या आगामी प्रोजेक्टपेक्षा तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. ती दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चालली आहे. तिचा हा नवा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंजिनिअर पदासाठी भरती
- ‘सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा’ ; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- ‘त्या’ १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेशी माझा दमडीचाही संबंध नाही, भुजबळांचा दावा
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

