Share

दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानकडून विंडीजचा १०९ धावांनी पराभव, मालिका १-१ अशा बरोबरीत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाने दुसरा कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने वेस्ट इंडिजसमोर ३२९ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा दुसरा डाव २१९ धावांवर अटोपला.

जमैका येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात पाकिस्तानने ३०२ धावांची मजल मारली. या डावात पाकिस्तानकडून फवाद आलमने २१३ चेंडुत १७ चौकारासंह १२४ धावांची नाबाद शतकी खेळी केली. तर वेस्ट इंडिजकडून केमार रोच आणि जेडन सिल्सने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव १५० धावांवर अटोपला. न्कृमाह बुनरने वेस्ट इंडिजकडून ११६ चेंडुत ६ चौकारासह ३७ धावांची सर्वाधीक खेळी केली. तर पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधीक ६ गडी बाद केले.

दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघाने ६ गडी गमावून १७६ धावांवर डाव घोषीत केला. सलामीवीर इम्रान बटने ४४ चेंडुत ५ चौकारासंह ३७ धावा केल्या. या डावात वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. यासह पाकिस्तानने चौथ्या डावात वेस्ट इंडिजसमोर ३२९ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र वेस्ट इंडिजचा दुसरा डाव २१९ धावांवर अटोपला. या डावात जेसन होल्डरने वेस्ट इंडिजकडून ८३ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधीक ४७ धावांची खेळी केली. तर पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधीक ४ गडी बाद केले. यासंह मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. शाहिन आफ्रिदीला सामनाविर आणि मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!