इंदापूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचं काल पाहायला मिळाले. काल राणे यांना अटक देखील करण्यात आली होती. यानंतर महाड येथील कोर्टाने काल जामीन मंजूर केला. दरम्यान, जामीन मिळाला असला तरीही राणेंच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे कारण आता नाशिक पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून २ सप्टेंबरपर्यंत नाशिकला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान, कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा दिवस. सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला. त्यामध्ये नारायण राणेंच्या विरोधात तसेच समर्थनार्थ आंदोलन करण्यात आल्याचं काल पाहायला मिळाले.
दरम्यान, या सर्व प्रकारावर भाजप नेते आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे. ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात राज्य सरकार वागते आहे ते पाहून तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही महाविकास आघाडीची लोक करत आहेत असं शेलार यांनी म्हटले आहे. मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याविषयी मा. देवेंद्र फडवीसजींनी पक्षाची भुमिका स्पष्ट केली. संयम सगळयांनीच ठेवायला हवा.
या कारवाई नंतर मंत्री अनिल परब यांची क्लिप सुद्धा बाहेर आलीय. राणे साहेबांनी स्वत सांगितल मी गुन्हा केलेला नाही. कुणाच्या म्हणण्यावरुन गुन्हे दाखल होत असतील तर मग तुम्ही क्लिप दाखवताय, आमच्याकडे सीडी आहे, हे लक्षात ठेवा. जर त्या सीडी बाहेर आल्या तर महाविकास आघाडी मधील जे पक्ष आता मांडीला मांडी लावून बसलेलेत तेच ऐकमेकांवर केसेस दाखल करतील असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटावर केआरकेची टीका, म्हणाला…
- ‘दोन वर्षांपूर्वीच मी शेतकरी झाले’; प्रीती झिंटाने व्यक्त केला आनंद
- मनपाच्या आदेशाला खो देणाऱ्या रुग्णालयांना आता स्मरण पत्र
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
