Share

करारा जवाब मिलेगा! वडिलांवरील कारवाईनंतर नितेश राणेंचे विरोधकांना आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटले. नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करत रात्री २४ ऑगस्ट रोजी त्यांना संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर  महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री त्यांचा जामीन मंजूर केला. एकंदरीत कालच्या या घटनेवरून नितेश राणे यांनी रात्री एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या राजकीय विरोधकांना फिल्मी अंदाजात आव्हान दिले आहे.

नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयी यांचा ‘राजनिती’ या चित्रपटामधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयी एका सभेला संबोधित करत म्हणतात की, ‘आसमान में थूकने वाले को शायद ये पता नही है की पलट कर थूक उन्ही के चेहरे पर गिरेगी,’ तर पुढे ‘करारा जवाब मिलेगा,’ असंही म्हंटले आहे. हा व्हिडीओ शेअर करत नितेश राणे यांनी विरोधकांना थेट धमकी दिली आहे.

कालपासून नारायण राणेंविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्याच तक्रारींच्या अनुषंगाने नारायण राणेंवर कारवाई करत रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काल रात्री त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!