🕒 1 min read
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप हे विविध ठिकाणी आमने-सामने आल्याचं आज सकाळपासूनच पाहायला मिळालं. तर नाशिक पाठोपाठ पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आज दुपारी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाकडून देखील दिलासा मिळालेला नाही.
राणेंच्या अटकेनंतर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांपासून ते राज्यातील विविध नेत्यांनी तीव्र निषेध केला असून आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘महाराष्ट्राने आज ३ पक्षांचा ३ पैशांचा तमाशा पाहिला. जन आशीर्वाद यात्रेला जनता-जनार्दनाने भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे पोटदुखी झालेल्या मविआ सरकारने हीन पातळी गाठली. केंद्रीय मंत्र्याला अटक करून लोकशाहीची क्रूर हत्या करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध करावा तितका कमीच!,’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
पुढे ते म्हणाले, ‘कोकण हा केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा बालेकिल्ला. राणेसाहेब कोकणात निधड्या छातीने टक्कर देतात, याचा शिवसेनेला राग आहे. त्यामुळे राज्याची मान खाली गेली तरी चालेल, राणेंना अटक करायचीच या सूडबुद्धीने मविआ सरकारने कारवाई केली. आघाडीतल्या दोन घटकपक्षांचं कारवाईला समर्थन आहे का?,’ असा सवाल पाटील यांनी केला आहे.
कोकण हा केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा बालेकिल्ला. राणेसाहेब कोकणात निधड्या छातीने टक्कर देतात, याचा शिवसेनेला राग आहे. त्यामुळे राज्याची मान खाली गेली तरी चालेल, राणेंना अटक करायचीच या सूडबुद्धीने मविआ सरकारने कारवाई केली. आघाडीतल्या दोन घटकपक्षांचं कारवाईला समर्थन आहे का?
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 24, 2021
‘संसदेसह प्रदीर्घ विधिमंडळ कारकीर्दीचा अनुभव असलेले शरद पवार मविआ आघाडीचे शिल्पकार आहेत. लोकशाही मूल्ये मानणाऱ्या पवारसाहेबांच्याच पक्षाकडे महाराष्ट्राचे गृहखाते आहे. राणेसाहेबांच्या अटकेसाठी शिवसेनेने गृहमंत्र्यांनी परवानगी घेतली होती? पवारसाहेब यावर काही बोलतील का?,’ असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- संतापाची लाट! रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याला जोड्याने मारून दहन
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा
- राणेंच्या घराबाहेर वरुण सरदेसाईंची पोलिसांना अश्लिल शिवीगाळ, मनसेकडून व्हिडिओ पोस्ट
- राणेंच्या अटकेमुळे आम्ही घाबरणार नाही , दडपणार नाही- केंद्रीय मंत्री भारती पवार
- सरकारच्या जीवावर तुम्ही कोणाकोणाला त्रास देणार?; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

