Share

‘ठाकरे सरकारच्या तालिबानी कारभारामुळे राज्यात लोकशाहीचा मुडदा पडला’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकावर निशाना साधायला सुरुवात केली आहे. आता भाजपच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरू ट्वीट करून ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे. ‘महाराष्ट्राची जनता सध्या अफगाणिस्तानचा अनुभव घेत आहे. महाराष्ट्रातल्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या तालिबानी कारभारामुळे राज्यात लोकशाहीचा मुडदा पडला आहे.’ असा घणाघात भाजपने केला आहे.

तर आता भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी देखील नारायण राणे यांच्यावर केलेल्या कारवाईची निषेध केला आहे. ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही’. असे नड्डा म्हणाले आहेत. तर, भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेला मिळत असलेल्या मोठ्या प्रतिसादाला हे लोक घाबरले असल्याने अशी कारवाई होत असल्याचे देखील नड्डा म्हणाले आहेत. काहीही झाले तरी आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू जन-आशीर्वाद सुरूच राहणार असे जे.पी नड्डा म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!