Share

संतापाची लाट! रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याला जोड्याने मारून दहन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढले याच्या निषेधार्थ औरंगाबाद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सावंगी बायपास रोडवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला जोड्याने मारून त्याचे दहन करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जन आशीर्वाद यात्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

देवाला सोडलेला वळू जसा कोणत्याच कामाला चालत नाही तसेच राहुल यांचे आहे. ते कोणत्याच कामाचे नाहीत. पंतप्रधान म्हणून मोदी जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहेत, तर राहुल गांधी या पदासाठी निष्क्रिय आहेत. अशी टीका बदनापूर येथील सभेत केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर केली होती. त्यांच्या या वक्तव्याबद्दल सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

जालना या ठिकाणी सर्वप्रथम रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळण्यात आला होता. मराठवाड्यातील सर्वठिकाणी याचा निषेध व्यक्त केला जात आहे. सावंगी बायपास रोड येथे सोमवारी (दि.२३) तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्यास जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, रामराव शेळके आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!