Share

‘पोलीस खात्यातील काही लोक सरकारने बस म्हटलं की लोटांगण घालतायत’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली आहे. ‘नारायण राणेंच्या विधानाचे भाजप समर्थन करत नसली तरी पोलिसांच्या कारवाईविरोधात भाजप पूर्णपणे राणेंच्या पाठीशी उभी आहे,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच पोलीसांच्या भूमिकेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उभा केला आहे.

‘मी पोलीस आयुक्तांचं पत्र वाचलं. ते काय स्वत:ला छत्रपती समजात का? जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा, कोणत्या कायद्याने पोलीस आयुक्तांना अधिकार दिला आहे. पोलिसांचा गैरवापर सुरु आहे. मला महाराष्ट्राच्या पोलिसांबाबत नितांत आदर आहे. मी पाच वर्षे त्यांच्या त्यांच्या सोबत काम केलंय. त्यांची क्षमता मला माहितीये. मात्र अशी कारवाई केल्यानंतर पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्न निर्माण होईल. आधीच या सरकारच्या काळात वसुली कांड झाली त्यामुळे राज्यातील प्रामाणिक पोलिसांबाबत देखील इतर लोकांची नजर बदलली आहे,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

पुढे ते म्हणाले, ‘ज्या प्रमाणे सरकार पोलिसांचा वापर करतंय त्यावरून समजतंय हे पोलिसजीवी सरकार झालंय. काही लोक सरकारने बस म्हटलं की लोटांगण घालतायत. सरकारला खुश करण्यासाठी पोलीस कारवाई करत आहेत. या सरकारमध्ये चाललंय ते योग्य नाहीये. मी काय धमकी वगैरे देत नाही सल्ला देतो. त्यामुळे पोलिसांना हा सल्ला देतो कि कायद्याने काम करा. बेकायदेशीर काम करणारे पोलीस आता कुठे आहेत हे मी सांगण्याची गरज नाही. त्यामुळे कायद्याने काम करा,’ असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!