🕒 1 min read
मध्य प्रदेश : रक्षाबंधनाच्या दिवशी बांगड्या विकणाऱ्या मुस्लिम तरुणाला त्याचे नाव विचारत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील इंदोरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या गोविंद नगरमध्ये ही घटना घडली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये प्रादेशिक स्थानिक लोक बांगड्या विकणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण करतांना दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या बॅगमधून एकापाठोपाठ अनेक बांगड्याही काढल्या. स्थानिक लोकांकडून या बांगडी विक्रेत्या व्यक्तीला मारहाण केल्याच्या बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मारहाणीच्या या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
बांगड्या विकण्याच्या बहाण्याने महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप करत मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये लोकांच्या जमावाने एका तरुणाला मारहाण केली आणि शिवीगाळ केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांना बांगडी विक्रेत्याला मारहाण करत त्याचा माल जमिनीवर फेकताना आणि त्याला शिवीगाळ करताना दिसत आहे. काही हल्लेखोरांनी पीडितेचे पैसेही हिसकावले.
दरम्यान, यासंदर्भात बाणगंगा पोलीस स्टेशनच्या राजेंद्र सोनी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. ते म्हणाले की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. परंतु पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दहीहंडीला परवानगी द्या नाहीतर आंदोलन करु’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- श्रुती मराठेचा साडीमधील सुंदर लुक चाहत्यांच्या पसंतीस
- आर माधवनच्या मुलाची निरज चोप्रासोबत होत आहे तुलना
- ‘जनआशीर्वाद यात्रेला लोक आशीर्वाद नाही तर शिव्याशाप देत आहेत’-जयंत पाटी

