🕒 1 min read
दिल्ली: २०२२ मध्ये दिल्लीतील महापालिका निवडणुकींसाठी भाजपने रणनीती आखण्यासाठी दोन दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित केले आहे. भाजपच्या दिल्ली युनिटचे वरिष्ठ नेते २३ ऑगस्टपासून हरिद्वार येथे दोन दिवसीय ‘चिंतन शिबिर’ मध्ये उपस्थित राहणार आहेत. यामध्ये नगरपालिका निवडणुका आणि दिल्लीतील एकूण राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्याने दिली आहे.
आम्ही गेल्या काही वर्षांपासून महापालिका निवडणुका जिंकत आलो आहोत. त्यामुळे आम्हाला पुन्हा पालिका जिंकत आमची कामगिरी कायम ठेवणे आवश्यक आहे. असे मत भाजप पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
कोरोना महामारीचा परिणाम महापालिका निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. तसेच करोना काळात काँग्रेसने पुन्हा लोकांजवळ पोहोचण्याची संधी गमावली आहे. त्यामुळे आम्ही आमची विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. शिवाय ही निवडणूक आमच्या हातातून निसटत असेल तर ती त्रिशंकू करण्यावर भर देऊ. त्यामुळे या सर्व बाबींबर शिबिरात चर्चा केली जाणार असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्याने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दहीहंडीला परवानगी द्या नाहीतर आंदोलन करु’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- श्रुती मराठेचा साडीमधील सुंदर लुक चाहत्यांच्या पसंतीस
- आर माधवनच्या मुलाची निरज चोप्रासोबत होत आहे तुलना
- ‘जनआशीर्वाद यात्रेला लोक आशीर्वाद नाही तर शिव्याशाप देत आहेत’-जयंत पाटी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
