Share

शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून, आजवर पावणे सात लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात ४ लाख ७२ हजार नागरिकांनी पहिला तर १ लाख ९८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. असे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिम राबविण्यास सुरूवात झाली आहे. १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी मिळाल्यामुळे लसीकरणाला गती मिळाली आहे. जुलै महिन्यात लसीचा पुरवठा कमी झाल्यामुळे अपेक्षाप्रमाणे लसीकरण झाले नाही. मनपाला शहरासाठी ११ लाख ७७ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

त्यामुळे मनपाने जंम्बो लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय घेत ११५ वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू केले. सुरूवातीला नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र एप्रिल नंतर प्रत्येक महिन्यात एक लाख नागरिकांचे लसीकरण झाले. ऑगस्ट महिन्यात लसीचा पुरवठा एकदम वाढल्यामुळे लसीकरणाला गती मिळाली आहे. आतापर्यंत ६ लाख ७१ हजार २८ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यापैकी ४ लाख ७२ हजार नागरिकांनी पहिला तर १ लाख ९८ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!