Share

गंभीर! कोरोनाची तिसरी लाट; पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा’, निती आयोगाच्या सूचना

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. मात्र, हळूहळू ती लाट ओसरली. त्यामुळे निर्बंध शिथील करत जीवनमान पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. मात्र, या सर्व बाबी सुरू असताना कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक तज्ज्ञ तिसऱ्या लाटेबाबत गंभीरपणे इशारा देत आहेत.

मात्र, आता तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्यात. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या एका अहवालानुसार, सप्टेंबर २०२० मध्ये दुसऱ्या लाटेआधीच नीती आयोगाने याचा अंदाज लावला होता. परंतु हा अंदाज त्यापेक्षा खूप जास्त आहे. त्यावेळी, गंभीर/मध्यम स्वरूपाची गंभीर लक्षणे असलेल्या सुमारे २० टक्के रुग्णांना निती आयोगाने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी आधारित पॅटर्नवर हॉस्पिटल बेड बाजूला ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. ‘कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपल्याला सजग राहणे आवश्यक आहे. एका दिवसात ४ ते ५ लाख करोना रुग्ण येण्याचा अंदाज आहे. पुढच्या महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवले पाहिजेत. यात व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेड, ७ लाख नॉन-आयसीयू हॉस्पिटल बेड (त्यापैकी ५ लाख ऑक्सिजन बेड) आणि १० लाख कोविड आयसोलेशन बेड असावेत’, अशा सूचना निती आयोगाने दिल्या आहेत.

दुसऱ्या लाटेवळी म्हणजेच १ जूनला देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १८ लाख होती. तेव्हा २१.७४ टक्के रुग्णांना १० राज्यातील रुग्णालयात भरती करावं लागलं होतं. यापैकी २.२ टक्के रुग्णांना आयसीयूत भरती करण्यात आलं होतं.

दुसरीकडे, इंडियन सार्स- कोविड २ जीनोमिक्स कन्सोर्टियमचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितलं की, ‘आणखी तीन आठवडे थांबा म्हणजे, तिसऱ्या लाटेबाबतचं चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरचं मी वास्तविक टिप्पणी करू शकेल.’ तसेच ‘कोरोना विषाणूची तिसरी एक लाट येणार की, नाही हे जाणून घेण्याबाबत निश्चित अशी पद्धत नाही. पण दुसऱ्या लाटेइतकी ती त्रासदायक नसेल, असं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!