Share

‘मराठा आरक्षणाचं आंदोलन भाजप पुरस्कृत होते असे कसे म्हणता?’

Published On: 

मुंबई : २० ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे मूक आंदोलन करण्यात आले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनात उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेस नेते आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला होता.

‘राज्यात अनेक जिल्ह्यात आंदोलनं झाली, तेव्हा त्या त्या पालकमंत्र्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला. नांदेडचे पालकमंत्री कुठे आहेत? अशोक चव्हाण दिल्लीत सगळ्यांना भेटले, पण संभाजीराजेंना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही? आम्ही सुद्धा ९६ टक्के वाले मराठे आहोत’, अशी टीका संभाजीराजेंनी केली होती.

यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर देताना ते आंदोलन भाजपप्रणीत असल्याची टीका केली होती. त्यांच्या या आरोपाचा आज भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. ‘मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे सरकारची भूमिका समजून घेतात असं सत्ताधारी म्हणतायत. मग नांदेडचे आंदोलन भाजप पुरस्कृत होते असे कसे म्हणता? असा सवाल त्यांनी अशोक चव्हाण यांना केला. यासोबतच, मागास आयोगाचे काम सरकार सुरू का करत नाही? अशावेळी आंदोलन करू नका असे सरकार कसे म्हणू शकते?, असे सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केले.

अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले होते ?

‘संभाजीराजे मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारे भाजपमधील एकमेव नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर केलेल्या वैयक्तिक टिकेला मी उत्तर देणार नाही. परंतु, भाजप त्यांचा गैरवापर करते आहे. नांदेडमधील आंदोलन हे भाजपप्रणीत होते, याची कदाचित त्यांना कल्पना नसावी. या आंदोलनासाठी भाजपचे कार्यकर्ते गोळा करण्यात आले होते. बहुतांश मराठा संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाल्या नव्हत्या,’ असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!