मुंबई : जुहूमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यावसायाचा मुंबई पोलिसांनी पर्दा फाश केला आहे. या प्रकरणामध्ये एका मॉडेल आणि प्रसिद्ध अभिनेत्रीचा समावेश आहे. जुहूमधील एका हॉटेलमध्ये सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी ईशा खान नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ईशा खान ही गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये वेश्या व्यावसाय करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात सापडलेल्या अभिनेत्री आणि मॉडेलने लॉकडाऊनमध्ये काम गेल्याने या व्यावसायामध्ये पडलो असल्याचे या दोघींनी पोलिसांना सांगितले आहे.
ईशा खान ही एका तरुणीसाठी ग्राहकाकडून तासाला तब्बल २ लाख रुपये घेत होती. त्यातील ५० हजार रुपये स्वत:कडे ठेवून दीड लाख रुपये संबंधित तरुणीला देत असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी गेल्या एक पथक तयार करुन ईशावर पाळत ठेवली. बनावट ग्राहक बनून ईशाशी संपर्क साधला. त्यावेळी ईशाने इतर तरुणींचे फोटो बनावट ग्राहक बनलेल्या पोलिसांना पाठवले. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. ईशाने पाठवलेल्या फोटोमध्ये एका प्रसिद्ध मॉडेल आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ज्या महापौरांच्या कार्यक्रमाला गर्दी होते त्या जन आशीर्वाद यात्रेवर कशा बोलू शकतात?’
- एकनाथ शिंदेंनी धुडकावले राणेंचे ते वक्तव्य; म्हणाले…
- महाराष्ट्रावर कोरोनाची तिसरी लाट उसळणार ? ; तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा
- ‘एकनाथ शिंदेच नाही तर अनेक मंत्री नाराज; मंत्र्यांचा रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी’
- ‘शिंदेंनी ‘ते’ नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर मी…’; आशिष शेलार यांचं सूचक विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
