मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जन आशिर्वाद यात्रे दरम्यान शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळले असून फक्त सही पुरतेच मंत्री असल्याचं वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राणेंवर शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावर आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी देखील भाष्य केलं आहे.
‘एकनाथ शिंदेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार नाही. शहरांचा सुनियोजित विकास झाला पाहिजे. पण त्या नगर विकास खात्यात सुनियोजितपणा नाही. पर्यावरण मंत्री सिडको आणि एमएमआरडीएचे निर्णय घेताना आम्हाला दिसतंय. सध्या सुपर सीएमची पद्धत सुरू झाली आहे. त्याची आम्हाला चिंता आहे,’ असं शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं. पुढे ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि त्यांनी नारायण राणेंच्या कानात सांगितलं असेल तर त्यावर मी भाष्य का करावं.’ यामुळे आता शिंदे आणि राणे यांचे खरंच निकटचे संबंध आहेत का ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
एकनाथ शिंदेंचे काय स्पष्टीकरण ?
नारायण राणे यांच्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही. मी माझ्या पक्षात पूर्ण समाधानी आहे. मला माझ्या खात्यांतर्गत विषयावर निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मला दिलेलं काम मी नियोजनबद्ध रितीने पार पाडत आहे, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेव्हा राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले; पण शिवसेनेचं कोणी फिरकलंही नाही’
- एकनाथ शिंदेंनी धुडकावले राणेंचे ते वक्तव्य; म्हणाले…
- महाराष्ट्रावर कोरोनाची तिसरी लाट उसळणार ? ; तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- नार्वेकरांचा बंगला तोडला! सोमय्या म्हणाले, ‘करून दाखविले, आता पुढचा नंबर अनिल परबांचा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
