Share

महाराष्ट्रावर कोरोनाची तिसरी लाट उसळणार ? ; तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते.

परंतु मागील काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे आणि वाढलेल्या लसीकरणामुळे सध्या तरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. अशात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा यापूर्वी तज्ज्ञांकडून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी कोरोनाशी लढण्यासाठी तयारी केली आहे.

पण आता कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता धुसर झाल्याचं काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली तरी, अन्या लाटांप्रमाणे कोरोना विषाणूची तिसरी लाट प्राणघातक नसेल, असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनं यावर टिप्पणी करण्याचं टाळलं आहे. पण काही सदस्यांनी सांगितलं की, तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी आहे. तिसरी लाट आलीच तर ती फार पसरणार नाही. असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तर एका टास्क फोर्सच्या सदस्या म्हणण्यानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटी महाराष्ट्र आणि केरळात कोरोना रुग्ण झपाट्यानं कमी होण्याची शक्यता आहे. तुरळक राज्य वगळता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही घटल्याचं संबंधित सदस्यानं सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!