मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुकानं, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स अशा काहींची कोरोनाच्या निर्बंधातून सुटका करण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यातील मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं बंदच ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केल्यानंतर आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मंदिरांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.
मदिरालयांवर ज्यांचा विश्वास त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही. दारुवाल्यांना सूट देणारं, बार मालकांना सूट देणारं हे देशातील पहिलं राज्य सरकार आहे आणि हे जगातले एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, जे बीअर बार आणि दारुमालकांना सूट देतात, असं म्हणत मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
यांना मेट्रोचं उद्घाटन चालतं, पुण्यातील कार्यालयाचं उद्घाटन चालतं, डान्सबार सुरु केले तरी यांना चालतं, त्यामुळे कोरोना होत नाही का?, असा उद्विग्ण सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे जनआशीर्वाद यात्रा केली तर कोरोना येतो असं राज्यातील थोर नेत्यांना वाटतं, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी यावेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परमबीर सिंह यांच्याबद्दल नवीन खुलासा, सचिन वाझेला रोजचे २ कोटींचे टार्गेट
- ‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- खासदार नवनीत राणांवर मानहानीचा दावा ठोकणार, यशोमती ठाकूर यांचा इशारा
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

