Share

परमबीर सिंह यांच्याबद्दल नवीन खुलासा, सचिन वाझेला रोजचे २ कोटींचे टार्गेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अडचणीत आले आहेत. त्यांच्याबाबतीत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. सध्या तुरुंगात असलेल्या सचिन वाझे व त्यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात वसुलीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार बिमल अग्रवाल या व्यापाऱ्याने दाखल केली आहे. या तक्रारदराने परमबीर सिंह यांच्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

आपला एक नंबर बॉस परमबीर सिंग आहेत, असं सचिन वाझेने सांगितल्याचं तक्रारदाराने म्हटले आहे. यासोबतच तक्रारदाराच्या जबाबात भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. ‘पोलीस सेवेत दाखल होण्यापूर्वीच सचिन वाझेने व्यापारी व बुकींसोबत मिटिंग केली होती. पोलिस दलात नियुक्त होण्यापूर्वीच वसुलीसाठी वाझेची व्यापारी, बार मालक आणि बुकींसोबत बोलणी सुरु होती.’ असे तक्रारदाराने पोलिसांना म्हटले आहे.

परमबीर सिंग यांना रोजचे २ कोटीचे कलेक्शन पाहिजे होते. कोरोनामुळे वसुलीला फटका बसल्याने वाझेला हे टार्गेट दिले होते. वसुलीतील ७५ टक्के पैसे १ नंबरला तर २५ टक्के पैसे वाटून घेण्याचा प्लान ठरला होता. असा दावा तक्रारदार बिमल अग्रवाल यांनी केला आहे. दरम्यान तक्रारदार अग्रवाल यांनी जानेवारी-फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ मध्ये आरोपींनी आपल्याकडून ९ लाख रुपये वसूल केले होते. असा दावादेखील केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!