Share

‘तहसीलदार ज्योती देवरे’ प्रकरणाला वेगळे वळण, प्रशासकीय अहवालातून धक्कादायक बाब उघड

Published On: 

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात यामुळे खळबळ उडाली. ‘लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदतीऐवजी मारेकरी पोहोचवले,’ असे शल्य व्यक्त करीत नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ११ मिनिटांच्या ऑडिओ क्लिपद्वारे आपली सुसाइड नोट जाहीर केली आहे

मात्र, महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल देवरे यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ६ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठवला होता. त्याचीही चौकशी सुरू असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे.

विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या अहवालात जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८९ च्या नियम ३ मध्ये प्रत्येक शासकिय कर्मचाऱ्याने नेहमीच शासकिय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता ठेवावी आणि शासकिय कर्मचाऱ्यास अशोभनीय ठरेल अशा कोणत्याही गोष्टी करता कामा नयेत. असा स्पष्ट उल्लेख असताना तहसीलदार देवरे यांनी या बाबींचे पालन केले नसल्याचे दिसून येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या बाबींचा एकत्रीत विचार करता देवरे यांनी शासकिय कामात नितांत सचोटी, व कर्तव्यपरायणता ठेवलेली नाही. कामाची जबाबदारी निटपणे पार पाडलेली नाही. वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केला आहे. यावरून देवरे यांनी नागरी सेवा नियम १९८९ मधील नियम ३ च्या तरतूदींचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्याअनुषंगाने विभागिय आयुक्त स्तरावर नियमोचित कार्यवाही करण्याची विनंती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागिय आयुक्तांना पाठविलेल्या अहवालात करण्यात आली आहे.

या अहवालात पारनेर तालुक्यातील मौजे कर्जुले हर्या गावातील रहिवासी प्रयोजनासाठी सनद देताना अनियमितता, प्रांताधिकाऱ्यांच्या अधिकारावर अतिक्रमण, कोविड सेंटरमध्ये अफरातफर, विधानसभा निवडणूक खर्चात गैरव्यवहार, दंडाची रक्कम शासनजमा नाही, शासनाचे आर्थिक नुकसान, महसूल अधिनियमास हरताळ या प्रकरणांवर देवरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!