औरंगाबाद : सिल्लोड सोयगाव तालुक्यासाठी केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला नाही. गटविकास अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विकास कामांना खीळ बसलेली आहे. केंद्र सरकारने दिलेला निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यास टाळाटाळ करायची व राज्य सरकारच्या योजनांचा निधी खर्च करुन शाब्बासकी मिळवायची. असे अधिकाऱ्यांनी वागू नये. याचे चांगलेच परिणाम त्यांना भोगावे लागतील. असा इशारा भाजपा प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी यांनी यावेळी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले त्या काळापासून केंद्र सरकारच्या माध्यमातून १५ व्या वित्त आयोगाचा निधी ८० टक्के ग्रामपंचायत, १० टक्के पंचायत समिती, १० टक्के जिल्हा परिषद यांना विकास कामासाठी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले होते. सोयगाव तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींमध्ये १० कोटी तर पंचायत समिती स्तर १ कोटी रुपये प्राप्त झाले. सिल्लोड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींसाठी सुमारे २५ कोटी रुपये तर पंचायत समिती स्तरावरील सुमारे ३ कोटी प्राप्त झाले आहेत. त्यापैकी फक्त १ कोटी ५० लाखांचे नियोजन झाले आहे. उर्वरित निधी वाटपाचे अद्यापपर्यंत नियोजन झाले नाही.
तर सिल्लोड सोयगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीने दाखल केलेल्या कृती आराखड्यास पंचायत समितीने मंजूर न केल्यामुळे सर्व निधी ग्रामपंचायतच्या खात्यावर खात्यावर पडून आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून आलेला निधी खर्च केलेला नाही. दोन्ही पंचायत समितीने तात्काळ कृती आराखडे मंजूर करून विकास काम सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतींना आदेश द्यावेत. दोन्ही पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनास टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे आदींनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘..यामुळेच शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली’, खा.भावना गवळींचा खुलासा
- नितीन लांडगे यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपांची शहानिशा करण्याची जबाबदारी माधुरी मिसाळ यांच्यावर
- पारनेर तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया
- शेतकऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष लक्ष, रावसाहेब दानवेंचे प्रतिपादन!
- शिवसेनेच्या हल्ल्यांना आणि धमक्यांना मी घाबरत नाही – किरीटी सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
