Share

मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!

Published On: 

बीड : भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वतीने सोमवारी बीडमध्ये समर्थ बूथ अभियान कार्यशाळा व बीड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठक पार पडली. यानिमित्ताने बीड शहरात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. पण त्या बॅनरवर चक्क लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटोच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा फोटो बॅनरवर नसणे हा चर्चेचा विषय ठरला,

बीड शहरामध्ये सोमवारी भाजपवतीने समर्थ बूथ अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी भाजपच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो कुठेच दिसून येत आला नाही. याबाबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांच्याशी संपर्क साधला असता या पुढे अशा चुका होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने बीड जिल्ह्यातून सर्वप्रथम सर्जेराव तांदळे यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

‘मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही’, अशी घोषणा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!