लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आत्तापर्यंत उत्तर प्रदेशातील अनेक मोठ्या शहरांची नावे बदलली आहेत. यामध्ये इलाहाबादचे ‘प्रयागराज’ तर फैजाबादचे ‘अयोध्या’ असे नामकरण करण्यात आले आहे. आता अलीगडचे नाव देखील बदलण्यात येणार असून जिल्हा पंचायत बोर्डाच्या बैठकीत अलीगढचे नाव बदलून ‘हरिगड’ करण्याच्या प्रस्तावास देखील मंजुरी मिळाली आहे.
यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार जिल्हा पंचायतीची ही बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये नवनियुक्त अध्यक्ष विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विकास भवन सभागृह परिसरात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत अलीगढ जिल्ह्याचे नाव बदलून हरिगड करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तसेच बैठकीत सर्व सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान सर्वांनीच नाव बदलण्याच्या बाजूने मतं नोंदवली. तसेच त्यानंतर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वी २०१५ मध्ये अलीगढचे नाव बदलण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली होती. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेने अलीगडचे नाव हरिगड सुचवले होते. तेव्हा विहिंपने म्हणणे होते की ,अलीगडचे प्राचिन नाव हरिगडच होते. परंतु ते नंतर बदलण्यात आले. त्याअगोदर १९९२ मध्ये मुख्यमंत्री असताना कल्याण सिंह यांनी हरिगड असे नाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा ते अपयशी ठरले.
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर भारताची भूमिका स्पष्ट, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
- ‘भारतात शांतता नांदावी यासाठी लोकसभा अध्यक्ष्यांचे तिरुपतीला साकडे’
- ‘त्या’ धुंद नशेत ते देश, तिरंगा विसरले आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
