Share

तब्बल २० वर्षानंतर विंडीजचा फलंदाज झाला नव्वदीत धावबाद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जमैका येथे सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर पाकिस्तानने दुसऱ्या डावात ५ गडी गमावून १६० धावांची मजल मारली आहे. यासह पाकिस्तानचा संघाने दुसऱ्या डावात १२४ धावांची आघाडी घेतली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यान वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने २२१ चेंडुचा सामना करताना १२ चौकारासंह सर्वाधीक ९७ धावांची खेळी केली. अवघ्या तीन धावांनी ब्रेथवेटचे शतक हुकले. त्याला हसन अलीने धावबाद केले. ९० पेक्षा जास्त धावा केल्यानंतर शतक न करता धावबाद होणारा ब्रेथवेट हा २० वर्षानंतर पहिलाच वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. यापुर्वी २००१ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत रामनरेश सारवान हा धावबाद झाला होता.

या सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावात २१७ धावां केल्या होत्या. या धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २५३ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात ५ गडी गमावून १६० धावांची मजल मारली आहे. यासह पाकिस्तानचा संघ १२४ धावांनी आघाडीवर आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार बाबर आझम ५४ आणि फईम अश्रफ १२ धावांवर खेळत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!