मुंबई : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवी घोषणा केली आहे. काल १४ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी फाळणीच्या आठवणी ताज्या करत फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असे म्हटले आहे. त्यांनी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी भयावह स्मृती दिवस’ (विभाजन विभीषिका स्मृति दिवस) म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
त्यावर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे त्याग, बलिदान व मोठ्या कष्टाने मिळालेले आहे. या स्वातंत्र्यासाठी मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. परंतु स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात भाजप 14 ऑगस्ट हा दिवस स्मृतीदिन म्हणून साजरा करत आहे. हे दुर्दैवी असून देशाची पुन्हा फाळणी करण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न काँग्रेस हाणून पाडेल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
भारताबरोबर जे देश स्वतंत्र झाले त्या देशात हुकुमशाही सत्ता सुरू झाली. परंतु, जगातील सर्वात मोठा व गौरवशाली लोकशाही देश म्हणून भारताचा जगात लौकीक आहे. भाजपा त्याला तिलांजली देऊ पाहत आहे. 14 ऑगस्ट हा फाळणीचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस आहे. त्या रक्तरंजित दिवसाच्या स्मृतींना उजाळा देत नरेंद्र मोदी व भाजप देश तोडण्याचे काम करत आहे. जातीय तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे. देशाच्या एकात्मतेला धक्का पोहचण्याचे भाजपाचे हे मनसुबे काँग्रेसचा कार्यकर्ता हाणून पाडेल, असं पटोले म्हणाले.
दरम्यान काल मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो भारतीयांना स्थलांतर कराव लागलं आणि काहींना तर आपला जीवही गमवावा लागला. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाची आठवण म्हणून १४ ऑगस्टला फाळणी भयावह स्मृती दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात झाली चूक; भाजप आमदार म्हणाला, ‘अभ्यासू आणि ब्येष्ट’
- ‘…तर ते थांबलच पाहिजे’; गडकरींच्या ‘लेटरबॉम्ब’वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- ‘युवकांना सत्तापिपासूंच्या छाताडावर उभं राहून ‘सत्यमेव जयते’चा नारा बुलंद करण्याचे बळ मिळावे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

