🕒 1 min read
औरंगाबाद : गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांची पाहणी करून त्याचे व्हिडीओ सीडी सह प्रस्ताव सादर करण्यात यावा अशी मागणी रहिवासी भाऊसाहेब शेळके यांनी निवेदनाद्वारे केली आहे. येथील आमदारांच्या निष्क्रियतेमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता तरी या रस्त्यांचा वनवास संपेल अशी अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
गंगापूर व खुलताबाद या दोन तालुक्यातील रस्त्यांची पाहणी करताना चांगल्या स्थितीतील रस्ता, प्रशासकीय मान्यता मिळालेले रस्ते, सध्या काम चालू असलेला रस्ते, प्रशासकीय मान्यता गरजेची असलेले रस्ते अशा प्रकारात वर्गीकरण होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. भिवधानोरा ते धनगरपट्टी रस्त्यासाठी दोन वर्षांपूर्वी २ कोटींची मागणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या स्तरावरून विभागीय अभियंत्यांनी केली होती.
त्यांनीच शेळके यांना उपोषणापासून परावृत्त करत आश्वासन दिले होते. त्याचे फलित म्हणून संबंधित अधिकारी यांनी विशेष निधी डागडुजी साठी ३५ ते ४० लाख मंजूर केले होते. परंतु त्यात रस्ता होणे शक्य नाही तसेच डागडुजी होणे शक्य नाही. तरी आलेला निधी हा शासनास परत पाठवून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सचिव यांनी नवीन व्हिडिओ बनवण्यात यावा. आमदार प्रशांत बंब यांच्या निष्क्रियतेमुळे, भिवधानोरा धनगरपट्टी सह तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिल्याचे शेळके यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- लव्ह जिहाद रोखा, भाजपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
- ‘मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल घेतली नाही तर सरकारला राज्य चालवणे कठीण’
- ‘बाहेर संविधानाची भाषा, मात्र संघटनेत त्याच्या उलट काम’; कपिल पाटलांवर गंभीर आरोप
- नामांतर शहीद स्मारकाचे काम गतीने करा, आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची कुलगुरूंकडे मागणी!
- ‘मी एकटाच आझाद मैदानावर उपोषण करणार, एक दिवस की बेमुदत हे समाजाने मला सांगावं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
