Share

‘मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल घेतली नाही तर सरकारला राज्य चालवणे कठीण’

Published On: 

पुणे : मराठा समाजाला अद्यापही आरक्षणाची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झाला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता मराठा समाज हा पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महापूर आणि राज्यातील कोरोनाची स्थिती ओसरल्यानंतर आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन करणार आहे.

दरम्यान, आज मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समन्वयक, विविध मराठा संघटनांचे कार्यकर्ते हे या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी मराठा समाजातील व्यक्तींच्या बाजू, भावना ऐकून घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी पुढील भूमिका जाहीर केली. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल घेतली नाही तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही, असा सज्जड दम मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या चिंतन बैठकीत देण्यात आला आहे.

तर या बैठकीत संभाजीराजे म्हणाले राज्य सरकार हे विसरले की आपण रिव्ह्यू याचिका केली आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे असा इशारा देखील त्यांनी ठाकरे सरकारला दिलाय. तर गायकवाड समितीच्या त्रुटी असतील तर त्याचा देखील अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचा आहे असे देखील संभाजीराजे पुण्यात बोलताना म्हणाले. तर राज्य सरकारने समाजाला सामाजिक मागास दाखवणे देखील गरजेचं असल्याचे देखील यावेळी संभाजीराजेंनी नमूद केल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!