Share

लव्ह जिहाद रोखा, भाजपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Published On: 

मुंबई : श्रीरामपूर, अहमदनगर येथे लव्ह जिहादची गंभीर घटना घडली असून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असून एफआयआरमध्ये संशयित आरोपीचे नावदेखील नाही. संताप व्यक्त करण्यासाठी लोकांनी काढलेल्या मोर्चालाही पोलिसांनी परवानगी नाकारली. याप्रकरणी राजकीय दबाव असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या विषयावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी ही माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. त्यात ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रात लव जिहादची वाळवी वेगाने पसरते आहे. भोळ्याभाबड्या हिंदू मुलींना फसवून जाळ्यात ओढले जात आहे. श्रीरामपूरमध्ये एक १४ वर्षाची मुलगी याचा ताजा बळी आहे. महाराष्ट्रात तातडीने लव जिहाद विरोधी कायदा करा. हा जिहाद रोखा.’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, बेलापूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत आपल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला सिकंदर शेख नावाच्या मुलाने फूस लावून पळविल्याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. हे कुटुंब भटक्या विमुक्त समाजातील असून विळे, खुरपे विकण्याचा या कुटुंबाचा व्यवसाय आहे. पळवून नेलेल्या मुलीच्या वडिलांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. चार मुली व एक मुलगा असा या महिलेचा परिवार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!