Share

‘बाहेर संविधानाची भाषा, मात्र संघटनेत त्याच्या उलट काम’; कपिल पाटलांवर गंभीर आरोप

Published On: 

पुणे : स्वातंत्र्य काळापासून सामाजिक बदलासाठी काम करणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप झालेत. लोक भारतीचे आमदार आणि सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त कपिल पाटील आणि राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्यावर नियमांना केराची टोपली दाखवत मर्जीतील लोकांना संघटनेवर लादल्याचा आरोप झाला आहे.

विशेष म्हणजे हे आरोप करणाऱ्यांमध्ये राष्ट्र सेवा दलाच्या माजी अध्यक्षांसह अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. कपिल पाटील यांनी आपले राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी गणेश देवींमार्फत बेकायदेशीरपणे राष्ट्र सेवा दल संघटनेवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा गंभीर आरोप सेवा दलाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रकाश कांबळे यांनी केलाय. तसेच या कृतीचा निषेध करण्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी आज (9 ऑगस्ट) क्रांती दिनी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांना मिळालेले पुरस्कार परत केले.

प्रकाश कांबळे म्हणाले, 80 वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या समाजवादी राष्ट्र सेवा दल संघटनेत बोगस सभासद नोंदणी करण्यात आली. याआधी कधीही सेवादल सदस्य नसलेल्या गणेश देवी यांना थेट राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले. आमदार कपिल पाटील यांनी आपल्या मर्जीतील लोकभारती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सेवादलाचे पदाधिकारी म्हणून नेमले. कपिल पाटील यांनी सेवादल संघटनेत अवाजवी, बेकायदेशीर हस्तक्षेप केला. आपल्या राजकीय फायद्यासाठी सेवादलाचा गैरवापर सुरू केला आहे.

‘प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटने बाहेर घालवलं’

‘आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कपिल पाटील यांनी अडचणीचे ठरतील अशा ज्येष्ठ सेवादल विश्वस्त व पूर्णवेळ कार्यकर्त्यांचं बेकायदेशीरपणे निलंबन केलं. प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटने बाहेर घालवलं. संघटनांर्तगत लोकशाहीचा व सेवादल संविधानाचा अनादर करत कपिल पाटील व गणेश देवी हे सध्या सेवादलात मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत,’ असाही आरोप कांबळे यांनी केला.

‘संविधानाची भाषा करणाऱ्या देवींच्या मनमानी कार्यपद्धतीच्या निषेधार्थ पुरस्कार परत’

आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मिळालेल्या श्रीकांत लक्ष्मी शंकर म्हणाले, ‘देशातील लोकशाही, संविधान वाचविण्याची सदैव भाषा बोलणारे भाषातज्ञ गणेश देवी लोकशाहीविरोधी, मनमानी पद्धतीने काम करत आहेत. या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी 25 ते 30 वर्षे सेवादलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते अत्यंत नाईलाज आपले पुरस्कार आज परत करत आहेत.’

‘कपिल पाटील कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रत्यक्ष बैठका टाळत आहेत. त्यांनी आपल्या आमदारकीचा प्रभाव टाकत पोलीस यंत्रणेवर दबाव आणला. यातून त्यांनी सेवादल सैनिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी राष्ट्र सेवा दलाचे स्वतंत्र, समाजवादी अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सर्व सेवादल सैनिक सनदशीर मार्गाने सेवादल वाचविण्याच्या आपला लढा सुरूच ठेवतील,’ असंही या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले. यावेळी सेवादल सैनिक मिहीर थत्ते, सुहास कोते, जीवराज सावंत आदी महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!