Share

‘मी एकटाच आझाद मैदानावर उपोषण करणार, एक दिवस की बेमुदत हे समाजाने मला सांगावं’

Published On: 

पुणे : मराठा समाजाला अद्यापही आरक्षणाची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झाला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता मराठा समाज हा पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महापूर आणि राज्यातील कोरोनाची स्थिती ओसरल्यानंतर आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन करणार आहे.

दरम्यान, आज मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समन्वयक, विविध मराठा संघटनांचे कार्यकर्ते हे या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी मराठा समाजातील व्यक्तींच्या बाजू, भावना ऐकून घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी पुढील भूमिका जाहीर केली.

मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून गेली कित्येक वर्षे मी महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या बाजु ऐकून घेण्यासाठी बाहेर फिरत आहे. मोजकेच दिवस घरी असतो. मागील काही दिवस अनेकजण विचारत आहेत की संभाजीराजेंनी आता भूमिका काय आहे? संभाजीराजे मॅनेज झालेत का ? पण संभाजीराजेंची भूमिका स्पष्ट आहे, जे राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं जो वंचित त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. लोकांना फसवणं छत्रपतींच्या रक्तात नाही, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

‘समाजाने ताकद दाखवलीये. ५० हुन अधिक मोर्चे मराठा समाजाने केले. मात्र आता एकच विनंती आहे, तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा मी एकटाच आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करेन. एक दिवस असो कि बेमुदत…समाज सांगेल तितके दिवस मी हे उपोषण करेन,’ अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. यासोबतच, आजच्या बैठकीत उपस्थित काही युवकांनी नांदेडमध्ये मूक आंदोलन करावे अशी मागणी उचलून धरली. पुढील मूक मोर्चा हा नांदेडमध्येच व्हावा अशी संभाजीराजेंकडे सातत्याने ते मागणी करत होते. तर संबोधन करताना ही मागणी मान्य करत पुढील मूक मोर्चा हा नांदेडमध्येच होईल अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली. यासोबतच, हा मोर्चा कोणीही कायदा हातात न घेता, कोरोनाचे नियम पाळून करण्यात यावा अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!