औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी जातीयवाद्यांच्या हल्ल्यात नांदेड येथे ४ ऑगस्ट १९७८ रोजी हुतात्मा झालेले शहिद पोचिराम कांबळे, जनार्धन मवाडे यांना विद्यापीठाच्या कमानी लगतच्या शाहिद स्तंभावर अभिवादन करण्यात आले. यावेळी नामांतर शहीद स्मारकाचे काम गतिमान करावे. अशी मागणी आंबेडकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने कुलगुरूंकडे करण्यात आली आहे.
नामांतर शहीदांचे स्मारक उभारण्याची मागणी प्रलंबित असल्याने नामांतर शहिदांच्या स्मारकासाठी विद्यापीठाच्या मध्यवर्ती भागातील जागा निश्चित करावी. किमान १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी व स्मारक उभारण्याची प्रक्रिया गतिमान करावी, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांच्या गठीत केलेल्या समितीत प्रत्यक्ष वृत्तांकन करणारे जेष्ठ पत्रकार, नामांतर लढ्यातील प्रत्यक्ष सहभागी व विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी यांचा समावेश करावा.
१४ जानेवारी २०२२ पर्यंत स्मारकाचे भूमिपूजन करण्यात यावे, नामांतर शहिद स्मारकाचे स्वरूप कसे असावे यासाठी सूचना मागविण्यात याव्या. नामांतर लढ्यातील शहिदांच्या वारसाला शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यापीठाच्या सेवेत सामावून घ्यावे. या मागण्याचे निवेदन प्र. कुलगुरू डॉ. शाम शिरसाठ यांना देण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून या मागण्या प्रलंबित असून विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी यावेळी रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम, पँथर्स विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे आदींच्या वतीने करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढविणार, खासदार संजय जाधव यांचे विधान
- नीरज चोप्राप्रमाणेच राखी सावंतने फेकला भाला ; पाहा ‘हा’ भन्नाट व्हिडीओ
- शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला अटक होण्याची शक्यता
- भारतीय संघाला पहिल्या टेस्टपासून मिळेल ‘हा’ फायदा : दिनेश कार्तिक
- अनोखा उपक्रम! मुलाच्या लग्नाचा खर्च टाळत नागरिकांचे मोफत लसीकरण,आमदार गणपत गायकवाड यांचा पुढाकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
