Share

‘आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करा’, खा.गौतमची ‘गंभीर’ मागणी

Published On: 

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. ऑलिम्पिकमध्ये अनेक भारतीय खेळाडू देशाचे नाव उंचावत पदके पटकावत आहेत. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलण्याचे ठरवले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यावरून आता राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच, मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारही देण्याची मागणी जोर धरत आहे.

ट्विटरवर ‘भारतरत्न’ हा ट्रेंड सुरू असून भाजपाचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीच्याच नावे असायला हवा अशी प्रतिक्रिया गंभीर यांनी दिली आहे. तसेच ‘मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात यावे. हेही काम मोदी सरकारच करू शकते’, अशीही मागणी खा.गंभीर यांनी केली आहे.

तर दुसरीकडे या नामकरणाचा काँग्रेसने विरोध केला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण केले आहे. त्यांनी याची सुरूवात केलीच असेल तर आता नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांच्या नावाने असलेल्या स्टेडीयमचे नाव बदलावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव रणदीप सिंग सुरजेवाला यांनी मिल्खा सिंग यांच्या नावाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!