🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीला येत्या निवडणुकांमध्ये शह देण्यासाठी आता भाजप आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. अशातच आज सकाळीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची मुंबईत ‘कृष्णकुंज’वर भेट झाली. यामुळे येत्या काळात भाजप-मनसेची जवळीक वाढून युती होण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, या भेटीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘कोणी कोणाला भेटण्यावर बंधन नाही. मनसे आणि भाजपने एकदा ताकद आजमावून दाखवावीच. प्रत्येकाला भेटण्याचा अधिकार आहे. लोकशाही राहिली पाहिजे असे वाटते,’ असं राऊत म्हणाले होते.
राऊत यांच्या या विधानाचा आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी चांगलाच समाचार घेतला असून राऊत यांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीत असं खुलं आव्हान दिलं आहे. ‘संजय राऊतांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीच,’ असं नांदगावकर यांनी आव्हान दिलं आहे. दरम्यान, मनसे-भाजप युतीवर देखील त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
‘चंद्रकांत पाटील जेव्हा आले आणि गेले तेव्हा आनंदात होते. सगळ सकारात्मक होते. राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे नाशिक, पुणे आणि ठाण्याचा दौरा केला आहे. मुंबईतही पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. व्यक्तिगत पातळीवर सर्वच पक्षाची कामे सुरू आहेत. मात्र, दोन पक्ष भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न असेल तर त्याचा आनंदच असेल,’ असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऑगस्ट ऐवजी होणार ‘या’ तारखेला !
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- ‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
