मुंबई – गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय चर्चेत आहे. आता राज्यसरकारने एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय अंतिम निर्णयासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे.
हा विषय राज्यपाल लवकरात लवकर मगरी लागावा यासाठी राज्यपाल त्यावर लवकरात लवकर हस्ताक्षर करतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. त्या नियुक्त्या होऊन एमपीएससीचे कामकाज सुरू होईल मात्र निर्णय लवकर होणे अपेक्षित आहे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.
दरम्यान एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय राज्यपालांकडे प्रलंबित आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. ३१ जुलैच्या तीन दिवस अगोदर राज्यसरकारने तीन नांवे निश्चित करून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यावर राज्यपाल हस्ताक्षर करुन प्रस्ताव परत शासनाकडे पाठवतील असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाला धक्का! दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी सलामीवीर मंयक अग्रवाल बाहेर
- शहरातील विविध विकासकामाला गती देण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी घेतली बैठक
- बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप
- सावधानतेचा इशारा ; पुढचे २ महिने राज्यात जोरदार पाऊस कोसळणार
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
