🕒 1 min read
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महापुराच्या थैमानानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती सुधारू लागली आहे. पावसाची विश्रांती, राधानगरी धरणाचे बंद झालेले दरवाजे, नद्यांच्या पाणी पातळीतील घट आणि चौथ्या दिवशी वाहतुकीसाठी खुला झालेला पुणे बंगळुरू महामार्ग या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती सध्या विविध पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज चिपळूण येथील पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांस भेट दिली. यानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट करून पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्ट :
पूर ओसरून आठवडा होत आला, तरी अद्याप परिस्थिती बिकट आहे. यावेळी पूरग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने एक बाब लक्षात आली ; ती म्हणजे, नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यामध्ये विमा कंपन्या आडमुठी भूमिका घेत आहेत. या पूरामध्ये शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचेच नुकसान झालेले आहे. आधीच लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेले व्यवसाय, या पुरामध्ये झालेल्या नुकसानामुळे अधिकच संकटात सापडले आहेत.
मात्र याकडे कुणी फारसे लक्ष देताना दिसत नाही. विमा कंपन्या याचा गैरफायदा घेत असून, डोळ्यांदेखत झालेले नुकसान दिसत असूनदेखील नुकसान भरपाई देण्यास अवास्तव कारणे देऊन टाळाटाळ करीत आहेत. शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी वर्ग हा राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. व्यापारास संरक्षण व उत्तेजन दिले, तर अर्थव्यवस्था मजबूत होऊन राष्ट्राचा विकास साधला जातो. त्यामुळे, या पूरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, वाहन धारकांना केवळ शासकीय मदत जाहीर करून न थांबता, त्यांच्या झालेल्या नुकसानाची योग्य तितकी भरपाई विमा कंपन्यांकडून करण्यात यावी, यासाठी शासनाने यात लक्ष घालणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात मी प्रयत्नशील राहीन.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्व जातीधर्मांच्या लोकांना काँग्रेस कमिटी मध्ये स्थान द्या-बाळासाहेब थोरात
- ‘उद्धव ठाकरे यांची खरी मातोश्री ही ‘दहा जनपथ’ आणि ‘सोनिया गांधी’ या आहेत’
- मराठवाड्यात ‘एक्स-बँड रडार’ बसवण्याची डॉ. भागवत कराड यांची मागणी
- ‘शिवसेनेशी एकनिष्ठ राहा’, आ. अंबादास दानवे यांचा माजी भाजप कार्यकर्त्यांना सल्ला!
- ‘ताई, तुम्हाला गाणं गायचंच असेल तर राजभवनात जाऊन गावं लागेल’; चाकणकरांच प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
