औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीसाठी शहरात पक्षसंघटन मजबूत करा. वॉर्डावॉर्डात युवक, महिला, सर्व जातीधर्मांच्या लोकांना काँग्रेस कमिटी मध्ये स्थान द्या. असे निर्देश काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. त्यांनी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्या वेळी ते बोलत होते. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आहे. नुकतीच प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे शहर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह संचारला असून निवडणुकीची जोरात तयारी सुरू आहे.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आगामी महानगरपालिकेविषयी व पक्षसंघटन मजबूत करण्याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. औरंगाबाद शहरात काँग्रेस पक्ष मजबूत होत असून आगामी महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा झेंडा निश्चितच फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहराध्यक्ष हीशाम उस्मानी संघटन वाढीसाठी चांगले काम करीत असून त्यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे, ही चांगली गोष्ट असल्याचे ते म्हणाले. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वांनी मेहनत घ्यावी व पक्षसंघटन वाढण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- पी. व्ही. सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव ; पंतप्रधान मोदी म्हणाले…
- ‘उद्धव ठाकरे यांची खरी मातोश्री ही ‘दहा जनपथ’ आणि ‘सोनिया गांधी’ या आहेत’
- मराठवाड्यात ‘एक्स-बँड रडार’ बसवण्याची डॉ. भागवत कराड यांची मागणी
- ‘शिवसेनेशी एकनिष्ठ राहा’, आ. अंबादास दानवे यांचा माजी भाजप कार्यकर्त्यांना सल्ला!
- ‘ताई, तुम्हाला गाणं गायचंच असेल तर राजभवनात जाऊन गावं लागेल’; चाकणकरांच प्रत्युत्तर

