औरंगाबाद : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातील विविध संघटनांकडून मदत पाठवण्यात येत आहे. यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून देखील आता मदत केली जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाद्वारे जीवनावश्यक वस्तू पाठवून पूरग्रस्तांची मदत केली जाणार आहे. यासाठी शहरवासीयांना देखील मदतीचे आवाहन केले जात आहे.
कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रायगडमध्ये तुफान अतिवृष्टी झाली. यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. तसेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात अनेक ठिकाणी पुरानेही चांगलेच थैमान घातले आहे. तसेच कोरोना चे संकट आहे अजून कायम आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना तत्काळ मदत मिळणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत यामध्ये २० क्विंटल धान्य जमा केले आहे. यासह इतर साहित्यही मोठ्या प्रमाणावर जमा करण्यात आले आहे. अशी माहिती समन्वयक सतीश वेताळ आणि मनोज गायके, सुरेश वाकडे यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रात गेल्यावेळी पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चा तर्फे ट्रक भरून जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले होते. त्यानंतर आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने मोठे नुकसान केले आहे. यातून नागरिक सावरत आहेत. यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मदत दिली जाणार आहे. जमा झालेली मदत ही २९ जुलैला दुपारी रवाना करण्यात येणार आहे. नागरिकांनी गहू, साखर, तांदूळ, डाळी, तेल, मीठ, साडी, ब्लॅंकेट, बिस्किट, चिवडा या स्वरूपात मदत द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी समाजासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, वैद्यकीय शिक्षणात २७% आरक्षण
- गडकरी घेणार धाडसी निर्णय; महापुरातही कोल्हापूरचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटू देणार नाही
- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमारच्या इंग्लंड दौऱ्यात करण्यात आला ‘हा’ बदल
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- ऑलिम्पिक स्पर्धेतील मेरी कॉमचा प्रवास संपुष्टात, मात्र पराभवानंतरही जिंकले मन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

