🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील काही गावांमधील शाळा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. मात्र आता पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. १५ जुलैपासून कोरोना मुक्त गावात आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र काही गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने ६०५ शाळातील वर्ग पुन्हा एकदा बंद करावे लागले आहेत.
७ जुलैला शासनाने काढलेल्या आदेशानुसार किंवा सरपंच व ग्रामसेवकांना शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये शाळा बंद आहेत. जिथे कोरोनाचेे रुग्ण नाहीत त्याठिकाणी विशेष बाब म्हणून शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव घेऊन शासनाला पाठवण्यात येणार आहे. शालेय व्यवस्थापन समितीला मुदतवाढ द्या, अन्यथा नव्याने शाळा समित्यांची निवड करण्यात यावी असा ठराव मांडण्यात आला आहे.
जिल्ह्यातील १ हजार ३८० शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. त्यापैकी महिनाभरापासून कोरोनामुक्त गावात ६०५ शाळांमध्ये आठवी ते बारावी चे वर्ग सुरू झाले आहेत. त्यातच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने सध्या ११ वी चे वर्ग बहुतांश ठिकाणी भरत नाही. १५ जुलैला १९ टक्के तर १९ जुलैला ३९ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान १३८० शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. त्यात पहिल्याच दिवशी पासून शाळांना गावकऱ्यांचा, पालकांसह विद्यार्थ्यांची चांगली साथ मिळाली. आणि २९ % वरुन उपस्थिती वाढून ४० टक्के झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी समाजासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, वैद्यकीय शिक्षणात २७% आरक्षण
- गडकरी घेणार धाडसी निर्णय; महापुरातही कोल्हापूरचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटू देणार नाही
- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमारच्या इंग्लंड दौऱ्यात करण्यात आला ‘हा’ बदल
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- ऑलिम्पिक स्पर्धेतील मेरी कॉमचा प्रवास संपुष्टात, मात्र पराभवानंतरही जिंकले मन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

