🕒 1 min read
सिंधुदुर्ग : नैसर्गिक संकटाची पाहणी करायला गेलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांबद्दल ‘अरे – तुरे’ चे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता भाजपच्या नेत्यांचे कान टोचले आहेत.मुख्यमंत्री एखादी पाहणी करण्यासाठी जातात त्यावेळी प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी व अधिकारी उपस्थित राहतात. मग कुणीही मुख्यमंत्री असेल तर तसंच होणार. नैसर्गिक संकटकाळात पक्षीय मतभेद, पक्षीय वाद आणायचे नसतात असा मोलाचा सल्लाही अजित पवार यांनी भाजपला यावेळी दिला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने अजित पवारांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे. अजित पवारांच्या या विधानावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. ‘कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये,’ अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
‘हे लोक दौरा अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी करतात का? मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही,’ असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. यावरूनच, ‘कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये,’ असा प्रहार नितेश राणे यांनी केला आहे. ते सिंधुदुर्गात बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- दिपिका कुमारीने अचूक ‘लक्ष्य भेद’त केला उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश
- दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना; मुख्यमंत्री म्हणाले, ‘रात्री बाहेरच का पडल्या?’
- ‘गुजरात आणि महाराष्ट्र एकाच देशातील दोन राज्य; मग महाराष्ट्राला मदत एक वर्षानंतर तीही तुटपुंजी का ?
- आता पाहणी नाही मदत सुरु- आदित्य ठाकरे
- कौतुकास्पद! मराठमोळ्या दिपाली सय्यदकडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
