Share

दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना; मुख्यमंत्री म्हणाले, ‘रात्री बाहेरच का पडल्या?’

Published On: 

🕒 1 min read

पणजी : देशात अल्पवयीन मुलींसह महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे आणि गैरप्रकाराची समस्या ही गंभीर आहे. विकृत प्रवृत्तीमुळे केल्या जाणाऱ्या अशा घटनांचा सर्वच स्तरातून निषेध केला जातो. गोव्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर नुकतीच दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना उघडकीस आली होती. या घटनेचे पडसाद गोव्याच्या विधानसभेत देखील उमटले. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून विरोधकांनी राज्य सरकारच अशा घटनांना जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘तरुण मुलांच्या आई-वडिलांनी आपली मुलं रात्री कुठे जात आहेत याकडे लक्ष द्यायला हवं,’ असं विधान प्रमोद सावंत यांनी केलं आहे. या घटनेबाबत सविस्तर भाष्य सावंत यांनी विधानसभेत केलंय.

ते म्हणाले, ‘या घटनेत १० तरुण समुद्रकिनारी पार्टीसाठी गेले होते. यातील सहा जण घरी परतले मात्र चौघे जण तिथंच थांबले होते. यात दोन मुले आणि दोन मुली होत्या. अल्पवयीन मुलांचं अशा पद्धतीनं रात्रभर घराबाहेर राहणं योग्य नाही.’ यासोबतच, ‘एक १४ वर्षांची मुलगी संपूर्ण रात्रभर समुद्रकिनारी भटकत असेल तर आई-वडिलांना आत्मनिरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. केवळ मुलं ऐकत नाहीत म्हणून आपण केवळ सरकार आणि पोलिसांवर ही जबाबदारी टाकू शकत नाहीत,’ असं देखील प्रमोद सावंत म्हणाले.

यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री सावंत यांना चोख प्रत्युत्तर दिलं. ‘राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस आणि सरकारची आहे. ही जबाबदारी ते पार पाडू शकत नसतील तर मुख्यमंत्री पदावर राहण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही,’ असा घणाघात सरदेसाई यांनी केलाय.

तर, मुख्यमंत्री मुलांच्या पालकांवर दोष ढकलत आहे, हे पाहून धक्का बसल्याची प्रतिक्रिया अपक्ष आमदार रोहन खाउंते यांनी दिली. गोवा नेहमीच महिलांसाठी सुरक्षित राहिलंय मात्र भाजप सरकारमध्ये अशी परिस्थिती उरली नसल्याचा आरोपही खाउंते यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!