🕒 1 min read
नवी दिल्ली – दिल्ली पोलिसात मोठा बदल करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. १९८४ बॅचचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना हे आतापर्यंत सीमा सुरक्षा दलाचे संचालक होते. त्यांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आयटीबीपीचे महासंचालक एस. एस. देवसाल यांच्याकडे सीमा सुरक्षा दलाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
राकेश अस्थाना हे गुजरात कॅडरचे 1984 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याची महत्वपूर्ण चौकशीही अस्थाना यांच्याच नेतृत्वात झाली होती. त्यावेळेस ते सीबीआयचे एसपी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर लालू प्रसाद यादव हे सर्वोच्च शिखरावर असताना, चारा घोटाळ्यातच त्यांना अटक झालेली होती. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गुजरात कॅडरचे जे काही अधिकारी प्रतिनियुक्तीवर केंद्रात आले त्यात अस्थानाही आले.
सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच काळात त्याचा सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्यासोबत वाद झाला. नंतर अस्थानांची बदली सीबीआयबाहेर करण्यात आली. आताही सीबीआयच्या संचालकपदासाठी अस्थानांचं नाव चर्चेत होतं. पण त्यांना थेट दिल्लीच्या पोलीस कमिश्नरपदी नियुक्त करण्यात आलंय.
विशेष म्हणजे दिल्लीच्या कमिश्नरपदी एजीएमयूटी(AGMUT) अरूणाचल, गोवा, मिजोरम, आणि केंद्र शासित प्रदेश ह्या कॅडरच्याच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. पण अस्थाना याला अपवाद ठरलेत. गुजरात कॅडरचे अधिकारी असूनही ते दिल्लीच्या पोलीस कमिश्नरपदी नियुक्त केले गेलेत. दरम्यान, अस्थाना हे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अतिरिक्त महासंचालकही होते. त्यांच्या देखरेखीखाली अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युशीसंबंधीत अंमली पदार्थ प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नाही; ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे’
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची पत्राद्वारे खा. जलील यांना माहिती!
- ममता बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- कोरोनाचे संकट संपल्यानंतर वेरुळ महोत्सवाचे नियोजन करण्यावर लक्ष, अमित देशमुख यांचे आश्वासन
- उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं पंतप्रधान मोदींना जमलं मात्र मित्र पक्षाच्या राहुल गांधींना का नाही जमलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

