🕒 1 min read
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. महाड तालुक्यातील नाते रोडवरील तळई गावात दरड कोसळली. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ३२ घरांवर ही दरड कोसळली असून त्यात ७२ जण बेपत्ता असल्याची माहिती होती. त्यातच, सध्याच्या माहितीनुसार या दुर्घटनेत ३६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये सानुग्रह मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर @narendramodi यांची घोषणा
— PMO India (@PMOIndia) July 23, 2021
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या घटनेवर दु:ख व्यक्त करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळई गावात झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह मदत तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे’ असेही या ट्विटमध्ये म्हटलंय.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा.
महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2021
त्याचबरोबर महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे असे म्हणत ट्विट केले आहे. “महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री मंत्रालयात… हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले’
- ‘पूर परिस्थितीतही मुख्यमंत्री मातोश्रीवर आहेत, आम्ही थेट बोटीत बसून निर्णय घ्यायचो’
- ‘वर्षभर घरी बसून ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची व्याख्या बदललीच आहे की..’ भाजपचा टोला
- ‘काँग्रेसने मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले’, काँग्रेसचा हल्लाबोल
- रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती,19 तासानंतरही मदत नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
