रायगड – गेल्या दोन तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणावर मोठे संकट आले आहे. एकीकडे चिपळून महाडसारखी शहरे पुराच्या विळख्यात सापडली असताना कोकणातील डोंगर कपारीत वसलेल्या अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. महाडमधील तळई गावातही अशीच मोठी दुर्घटना झाली असून, या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
ही दुर्घटना काल घडूनही आजपर्यंत म्हणजे गेल्या 19 तासानंतरही गावकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यावर स्थानिक गावकरी आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. या दुर्घटनेप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दरेकर यांनी केली.
काल संध्याकाळी चारच्या रायगडमधील तळई गावात दरड कोसळली. या दरडीच्या ढिगाऱ्याखाली गावातील सुमारे ३५ घरे गाडली जाऊन मोठी दुर्घटना घडली.दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनीच मदतकार्य सुरू करून येथील गाडल्या गेलेल्या घरांमधून तब्बल ३२ मृतदेह बाहेर काढले आहेत. मात्र अद्याप एकही अधिकारी त्या ठिकाणी पोहचला नसल्याचे दिसून आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दानवेंचा धडाका : गणेशोत्सवासाठी तब्बल 112 रेल्वेगाड्या उपलब्ध होणार
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- पुण्यातील भिडे पुलात जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
