🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाबरोबरच अनेक राष्ट्रीय महामार्गांचे कामे सुरू आहेत. त्यातच नारायणगाव बायपास पुणे-नाशिक महामार्गाचे काम देखील सुरु होत. आता ते पूर्ण झाले आहे. याबद्दल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून माहिती दिली.
पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ता तयार झाला असून त्याचे फोटो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट केले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावातून हा रस्ता जाणारा हा बायपास, पुणे-नाशिक प्रवास अधिक सुखकर करेल असं नितीन गडकरींनी म्हटलंय. तसंच आता या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली उत्पादनंही वेगानं मुंबई- पुण्याच्या बाजारपेठांमध्ये सहज पोहोचतील असंही गडकरींनी ट्वीटमध्ये नमूद केलंय.
The Narayangaon, Pune bypass will ease travel between Pune and Nashik. Agricultural products would reach Mumbai-Pune Market easily. #PragatiKaHighway pic.twitter.com/3LMVQZZYkA
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 16, 2021
२०१६ ला या मार्गाचे काम सुरु करण्यात आले होते. ५ किलोमीटर लांब व ६० मीटर रुंद असा हा महामार्ग आहे. २०१८ मध्ये भूसंपादनामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. महामार्गासाठी गडकरी यांनी ३९ कोटीचा निधी दिला होता. नारायणगाव आणि खेडघाट येथील बायपास रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी त्यातील अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वत: पुढाकार घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मूठभर उद्योजकांची सौरऊर्जा प्रकल्पावर मक्तेदारी’, आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा
- व्यवस्थेला जेरीस आणू, पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही-विजय वडेट्टीवार
- मोदींच्या भेटीबाबत खुद्द शरद पवारांनी केला खुलासा, म्हणाले..
- ‘अमिताभ बच्चन हे मोदी सरकारच्या कामगिरीवर तर बोलत नाही ना?’, सत्यजित तांबे यांचे खोचक ट्विट
- पवार आणि मोदी यांच्यात राजकीय चर्चा तर होणारच!; ‘त्या’ भेटीवर दरेकरांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
