🕒 1 min read
वाराणसी – गेले वर्ष-दीड वर्ष आपण, किंबहुना संपूर्ण मानवजात कोरोना नावाच्या महाभयंकर आपत्तीचा सामना करीत आहे. पण अशा कठीण काळातही आपण थांबत नाही, थकत नाही, हे काशीनं, इथल्या जनतेनं दाखवून दिलं आहे. वाराणसीचा विकास आणि कायापालट भगवान काशीविश्वेश्वराच्या आशीर्वादानं आणि इथल्या जनतेच्या इच्छाशक्तीमुळेच झाला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
वाराणसी इथं 1 हजार पाचशे 83 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी आज काही वेळापूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. त्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी माता आणि बालकांच्या सुविधेसाठी 100 खाटांच्या विभागाचं, गोदौलिया इथल्या भव्य वाहनतळाचं तसंच पर्यटन विकासासाठी गंगा नदीसाठी रो-रो जहाजाचं आणि वाराणसी-गाजीपूर महामार्गावरच्या 3 पदरी उड्डाणपूलांचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.
आठशे 39 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आणि सार्वजनिक कामांचा शिलान्यासही मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या एकशे 43 ग्रामीण प्रकल्पांचा यात समावेश आहे. जपानच्या मदतीनं बांधण्यात आलेल्या रुद्राक्ष, या आंतरराष्ट्रीय सहकार आणि अधिवेशन केंद्राचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त
- पंतप्रधान मोदी वाराणसीत दाखल, १५०० कोटींच्या कामांचे लोकार्पण करणार
- पंतप्रधान मोदी युवकांना म्हणाले, ‘ज्याच्याकडे स्किल असेल तोच पुढे जाईल’
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
