🕒 1 min read
बीड : खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदाच्या यादीतून डावलल्यानंतर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षातील मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा सत्र सुरू झाले होते. बीड जिल्ह्यात ११ तालुकाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांचे दीडशेवर राजीनामे प्राप्त झाले. हे सर्वच्या सर्व राजीनामे नामंजूर केले असून आता आम्ही सर्व पंकजा मुंडेंच्या आदेशाने पक्षासाठी जोमाने काम करणार असल्याची स्पष्टोक्ती जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.
७ जुलै रोजी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होऊन नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आली. पण खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. यावरून मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांत आपल्या नेतृत्वाला डावलले जात असल्याची भावना तीव्र बनली. ९ जुलै रोजी बीड येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. या सर्व विषयांवर पंकजा मुंडे यांनी मुंबई येथे मंगळवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधत राजीनामे नाकारत असल्याचे सांगितले आहे.
भाजप हा आपला पक्ष आहे, जो आपण साऱ्यांनी मिळून वाडीवस्ती-तांड्यापर्यंत नेला आहे. पंकजा मुंडेंनी आपण आपले घर का सोडायचे, असे सांगत आमची समजूत काढली आहे. आता आम्ही त्यांच्या आदेशानुसार पक्षाचे काम अधिक ऊर्जेने करणार आहोत अशी प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत १९ जुलैपर्यंत वाढ
- डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाचा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘मुंबई विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल’, मनसेचा इशारा
- योगींच्या राज्यात कावड यात्रेला परवानगी; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले
- ‘लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा प्रकारे मोदी सरकार खिसा कापत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
